बीड जिल्ह्यात 2024 मध्ये 40 खुनांचे गुन्हे आणि खुनाचा प्रयत्न 191 गुन्हे

बीड़ जिल्हा पोलीस दलाने 2023/24 वर्षातील कामगिरी समोर आणली आहे. 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये हत्यांच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचे दिसून आले आहे. 2023 मध्ये बीड़ जिल्ह्यात एकूण 64 खुनाच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती, त्यापैकी 60 गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला होता. तर, 2024 मध्ये 40 खुनांच्या गुन्ह्यांची नोंद झाली असून, सर्वच गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे.

सध्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड़ जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न समोर आला आहे. 2024 वर्षाच्या शेवटी बीड़ पोलिसांनी वर्षभराचा अहवाल सादर केला आहे. 2023 मध्ये खुनाचा प्रयत्न या सदराखाली एकूण 165 गुन्हे नोंदवले गेले होते, त्यापैकी 164 गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला होता. तर, 2024 मध्ये खुनाचा प्रयत्न या सदराखाली एकूण 191 गुन्हे नोंदवले गेले आहेत, त्यापैकी 190 गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये खुनाचा प्रयत्नाचे गुन्हे वाढले आहेत.

राज्याच्या सरपंच हत्याप्रकरणामुळे बीड़ जिल्हा सध्या चर्चेत आहे. खंडणी प्रकरणात अटक केलेल्या वाल्मिक कराड यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरून विरोध करीत आहेत आणि बीड़चा बिहार झाल्याची टीका करत आहेत. बीड़ पोलीस दलाच्या कामगिरीबद्दल 2024 मध्ये खून आणि खुनाचा प्रयत्न या दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांच्या आकडेवारीनुसार, कारवाईच्या बाबतीत पोलिसांचे काम अधिक सरस झाले आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे, जरी खुनाच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये घट झाली असली तरी खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

error: Content is protected !!