संजय राऊत खोटारडे

पटणा | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले असून मंत्री आदित्य ठाकरेंचे नाव येऊ लागल्याने शिवसेनेचे खासदार संजय राऊतही या मैदानात उतरले आहेत. राऊत यांनी सुशांतच्या वडिलांवर गंभीर आरोप केले होते. यावर सुशांतच्या मामाने राऊत खोटे बोलत आहेत, असा आरोप केला आहे.

सुशांतचे त्याच्या कुटुंबाशी संबंध चांगले नव्हते असा दावा राऊत यांनी सामनामधून केला होता. सुशांतच्या वडिलांनी दुसरे लग्न केले होते, जे सुशांतला आवडलेले नव्हते, असा आरोप राऊत यांनी केला होता. यावर सुशांतचे मामा आर सी सिंग यांनी सांगितलं की, सुशांतच्या वडिलांनी दोन लग्न केली नाहीत. संजय राऊत चुकीचे बोलत आहेत.

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावरून चुकीचं वक्तव्य केलं आहे. राऊत असं वक्तव्य करून प्रतिमा मलिन करायचा प्रयत्न करत आहेत. असे काहीतरी बोलून एखाद्याची प्रतिमा मलिन करणं ही चांगली बाब आहे का? बिहारमध्ये जे राहतात त्या सगळ्यांना माहिती आहे, की सुशांतच्या वडिलांनी एकच लग्न केलं आहे, असं सिंग म्हणालेत.

दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पक्षाचे मुखपत्र सामनामध्ये अनेक आरोप केले आहेत. बिहार पोलीस आणि केंद्राने महाराष्ट्र सरकारविरुद्ध कट रचल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!