बीड, दि. ४ जानेवारी २०२५: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोन प्रमुख फरार आरोपींना बीड पोलिसांच्या विशेष शोध पथकाने अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदर्शन चंद्रभान घुले (वय २६, रा. टाकळी, ता. केज) आणि सुधिर ज्ञानोबा सांगळे (वय २३, रा. टाकळी, ता. केज) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांना पकडण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शोधमोहीम हाती घेतली होती. डॉ. संभाजी वायभसे यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि तांत्रिक तपासाच्या सहाय्याने पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेतले.
अटक केलेले दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.