शरद पवार अन् सुप्रिया सुळेंनी घरी बसावं, शेतीबाडी पाहावी, त्यांच्या वांग्याला बरेच पैसे मिळालेत भाजप नेत्याची सुप्रिया सुळें वरती टीका


धाराशिव: राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन आता जवळपास महिना झाला आहे. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या नेतृत्वातील सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन नागपूर येथे संपन्न झाले. त्यानंतर, राज्यात मंत्रिमंडळ विस्तारातील मंत्र्यांना खातेवाटपही करण्यात आले आहे. मात्र, अद्यापही काही मंत्र्यांनी आपल्या खात्याचा पदभार स्वीकारला नसल्याचे समोर आले आहे. राज्य सरकारच्या कॅबिनेटची पहिली बैठक गुरुवारी 2 डिसेंबर रोजी संपन्न झाली. या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले. मात्र, राज्यातील सरकारमध्ये मंत्री नावालाच असून मुख्यमंत्री Devendra Fadnavis हे एकटेच सरकार चालवतात, अशी टीका खासदार Supriya Sule यांनी केली होती. आता, Supriya Sule यांच्या या टीकेवर जलसंपदा मंत्री Radhakrishna Vikhe Patil यांनी टीका केली आहे. तसेच, Supriya Sule यांनी घरी बसून शेती करावी, असा टोलाही त्यांनी लगावला.

तुळजापूर दौऱ्यावर असलेल्या जलसंपदा मंत्री Radhakrishna Vikhe Patil यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा Sharad Pawar आणि खासदार Supriya Sule यांच्यावर जोरदार टीका केली. Devendra Fadnavis एकटेच सरकार चालवतात अशी टीका Supriya Sule यांनी केली होती, त्यावर Vikhe Patil यांनी खोचक उत्तर देत बाप-लेकींना घरी बसण्याचा सल्ला दिला आहे. “जनतेनं तुम्हाला नाकारलं आहे, जनाधार नसलेल्या यांनी आता घरी बसावं. Sharad Pawar आणि Supriya Sule यांनी घरी बसावं, शेतीबाडी पाहावी, त्यांच्या वांग्याला बरेच पैसे मिळालेत,” अशा शब्दात मंत्री Radhakrishna Vikhe Patil यांनी Sharad Pawar आणि Supriya Sule यांना टोला लगावला. तसेच, Supriya Sule यांनी आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वांग्याच्या शेतीबाबत मार्गदर्शन करावं, कारण वांग्याचे, बटाट्याचे पैसे एवढंच त्यांचं काम आहे,” असेही Vikhe Patil यांनी म्हटले.

error: Content is protected !!