पुण्यासोबतच अजून एक जिल्ह्याचे पालकमंत्री पद उपमुख्यमंत्री अजित पवार घेऊ शकतात. उपमुख्यमंत्री अजित पवार बीड जिल्ह्याचे पालकमंत्री घेऊ शकता. बावनकुळे यांच्या मते, बीडचा पालकमंत्री राष्ट्रवादीच्या वाट्याचा आहे आणि याबाबतचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस घेईल. अजित पवारांकडे दोन पालकमंत्री पदे असू शकतात
बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आणि राजकीय परिस्थिती लक्षात घेता, अजित पवार यांना पालकमंत्री पद देण्याचा विचार केला जात आहे. बीड जिल्ह्यातील परिस्थिती सुधारण्यासाठी आणि राजकीय समतोल साधण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो.