वाल्मिक कराड अडचणीत वाढ; विष्णू चाटेची पोलिसांसमोर महत्त्वाची कबुली, म्हणाला…

नवीन पुरावा: सरपंच अपहरण, हत्या आणि खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड अडचणीत

सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या तसेच पवनचक्की कंपनीकडून दोन कोटी रुपयांच्या खंडणीच्या मागणीच्या प्रकरणात अटक असलेला विष्णू चाटे याने मोठी कबुली दिली आहे. चाटेच्या या कबुलीच्या आधारे वाल्मिक कराड अडचणीत सापडला आहे.

सीआयडीच्या अहवालानुसार, चाटेने कबूल केले आहे की, वाल्मिक कराडने पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संभाषण केले होते. कंपनी अधिकाऱ्यांनी तक्रार दिली होती की, चाटेच्या फोनवरून कराडने धमकी दिली होती. सीआयडीने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात हा खुलासा केला आहे.

चाटेच्या कबुलीनुसार, खंडणीची मागणी त्याच्या स्वतःच्या फोनवरून केली होती आणि त्या वेळी वाल्मिक कराड देखील उपस्थित होता. त्यामुळे कराडचा खंडणी प्रकरणातील थेट संबंध उघड झाल्याचे स्पष्ट होते.

या नव्या पुराव्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तपास यंत्रणा कराडविरोधातील या नवीन पुराव्याच्या आधारे पुढील कारवाई करण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!