बीड दि.1 ( प्रतिनिधी):
गेवराई महामार्गाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंडे यांच्या नेतृत्वाखाली महामार्गाच्या पोलिसांनी टाकेबाज कारवाई केली असून यामध्ये आयशर टेम्पोसह गुटखा पकडला आहे. महामार्ग पोलिसांनी केलेल्या या धाडसी कारवाईचे कौतुक होत आहे.
मंगळवार दि.31 डिसेंबर 2024 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांच्या नेतृत्वात धडाकेबाज कारवाई करण्यात आली.
गुटका असणारा आयशर टेम्पो गेवराई महामार्ग पोलिसांनी पकडला आहे त्यात किती गुटखा आहे याची खातरजमा करणे साठी पोलीस स्टेशन गेवराई येथे सीसीटीव्ही मध्ये आयशर व ड्राइवर याना घेऊन जात आहेत, अशी माहिती मिळाली. त्यानुसार कारवाई करण्यात आली.