मंत्र्याच्या चालकाने हॉर्न वाजवल्यानं राडा,  नववर्षाच्या रात्री दोन गट भिडले, गावात संचारबंदी लागू

घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत, काही संशयितांना ताब्यात घेतले आणि गावात संचारबंदी लागू केली.

जळगाव जिल्ह्यातील पाळधी गावात 31 डिसेंबरच्या रात्री, शिवसेना शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांच्या वाहनाच्या चालकाने हॉर्न वाजवल्यामुळे दोन गटांमध्ये वाद झाला. या वादामुळे गावातील काही तरुण आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत, दगडफेक आणि जाळपोळ केली. परिणामी, 12 ते 15 दुकाने जाळली गेली आणि गावात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे.

घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत, काही संशयितांना ताब्यात घेतले आणि गावात संचारबंदी लागू केली. गावातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत आणि अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले आहे. घटना स्थळावरून आरोपी पळून गेल्याने, पोलिस अद्याप त्यांचा शोध घेत आहेत.

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या परिवाराला घेऊन जाणाऱ्या वाहनाच्या चालकाने हॉर्न वाजवल्याच्या कारणातून हा वाद झाल्याचे समजते. या घटनेनंतर, पाळधी गावात संचारबंदी लागू करण्यात आली असून, परिस्थिती निवळेपर्यंत संचारबंदीचा कालावधी वाढवला जाणार आहे. 20 ते 25 अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, दोन ते चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

error: Content is protected !!