ती वाल्मिक कराड यांची दुसरी पत्नी; धनंजय देशमुखांचा दावा

संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून बीडच्या मस्साजोगमधील (Santosh Deshmukh Murder) राजकीय वर्तुळात (political circle) आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सीआयडीकडून कसून चौकशी (CID investigation) सुरु असून, चार फरार आरोपींची खाती (bank accounts) गोठवण्यासाठी 13 बँकांना पत्र दिले आहे. मालमत्ता जप्तीची कार्यवाही (property seizure) पूर्ण झाली आहे. वाल्मिक कराड यांच्याशी संबंधित महिलेची चौकशीही (woman investigation) सीआयडी पथकाने केली आहे.

दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी सीआयडीच्या अधीक्षकांची भेट घेतली. या भेटीनंतर वाल्मिक कराड यांच्या पत्नीचा तपास सुरु असल्याची माहिती धनंजय देशमुखांनी दिली. तर सध्या ज्योती जाधव यांची चौकशी सुरु आहे. ज्योती जाधव ही वाल्मिक कराड यांची दुसरी पत्नी असल्याचा दावा धनंजय देशमुखांनी केलाय. वाल्मिक कराड सुरूवातीच्या दिवसात या महिलेकडे राहायला होते अशी प्राथमिक माहिती तपासात समोर आलेय. तर हत्या करणाऱ्या आरोपींना अटक व्हावी, अशी मागणीही धनंजय देशमुखंनी केली आहे. 

error: Content is protected !!