जिल्हा परिषदेतील दिव्यांग 20 लाभार्थी चौकशीच्या फेऱ्यात

जिल्हा परिषदेतील दिव्यांग 20 लाभार्थी चौकशीच्या फेऱ्यात

सीईओ जीवने यांच्या आदेशाने होणार चौकशी

बीड दि.29 (प्रतिनिधी):
प्रशिक्षणार्थी आयएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणानंतर राज्यात दिव्यांग लाभ घेणाऱ्याची तपासणी मोहीम सुरु करण्यात आली त्यातच जिल्हा परिषदेतील 20 संशयास्पद दिव्यांग कर्मचाऱ्यांची अपिलीय वैद्यकीय प्राधिकरणाकडून तपासणी करण्याबाबत कळवले होते. म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी बीड यांच्या आदेशास अनुसरून मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवणे यांनी गरजु व पात्र दिव्यांगांच्या सवलतीवर बिनबोभाटपणे डल्ला मारणाऱ्या एकूण 20 दिव्यांग कर्मचाऱ्यांची जे.जे समुह रुग्णालय मुंबई येथे व्यक्तीशः तपासणी करून घेण्याचे आदेश सीईओ जीवने यांनी दिले आहेत.
विविध शासकीय सोयी सवलती प्राप्त करण्याकरिता बऱ्याचदा धडधाकट व सुदृढ कर्मचारी शासनाची दिशाभुल करून व डॉक्टरांना हाताशी धरून दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिलविले. ही बाब पूजा मनोरमा दिलीप खेडकर या पॅटर्न ने पुन्हा एकदा विविध जिल्ह्यांमध्ये पसरली आहे. बीड जिल्हा परिषदेने या पूर्वीच संशयास्पद दिव्यांग कर्मचाऱ्यांची जे.जे समुह रुग्णालय, मुंबई येथून तपासणी करण्याबाबत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी आदेश दिले होते. तरीही हा गैरप्रकार आजतागायत बिनबोभाट सुरुच होता. म्हणून प्रहार संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या प्रयत्नाने राज्यातील सर्वच शासकीय- निमशासकीय कार्यालयातील संशयास्पद दिव्यांग कर्मचाऱ्यांची शोध मोहीम राबवून प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना संशयास्पद दिव्यांग कर्मचारी सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. म्हणून बच्चू कडू यांच्या आदेशाने बीड तालुका प्रहार शाखेने बनावट दिव्यांग कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण करून सर्वेक्षणांती कर्मचाऱ्यांची यादी जिल्हाधिकारी, बीड यांना सादर केली. तदनंतर निवासी उपजिल्हाधिकारी बीड यांनी दि. 11 नोहेंबर 2024 रोजी जिल्हा परिषदेतील एकून 20 संशयास्पद दिव्यांग कर्मचाऱ्यांची अपिलीय वैद्यकीय प्राधिकरणाकडून तपासणी करण्याबाबत कळवले होते. म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी बीड यांच्या आदेशास अनुसरून मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जिवणे यांनी गरजू व पात्र दिव्यांगांच्या सवलतीवर बिन बोभाटपणे डल्ला मारणाऱ्या एकूण 20 दिव्यांग कर्मचाऱ्यांची जे.जे समुह रुग्णालय, मुंबई येथे व्यक्तीशः तपासणी करून घेण्याचे आदेश दि.19 डिसेंबर 2024 रोजी संबंधित संशयास्पद दिव्यांग कर्मचाऱ्यांना दिले आहेत. सी.ई.ओंनी दिलेले आदेशात आरोग्य पर्यवेक्षक – 1, सहायक प्रशासन अधिकारी – 1, सहाय्यक लेखा अधिकारी – 1, कनिष्ठ प्रशासन अधिकारी – 1, आरोग्य सेवक – 2, औषध निर्माता – 1, सहशिक्षक – 5 व अन्य 8 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सीईओंनी या गैरप्रकारास प्रतिबंधित करणारे आदेश तात्काळ जारी केले आहेत. यापुढे जिल्हा परिषदेमधील अनेक संशयास्पद दिव्यांग शिक्षक कर्मचाऱ्यांची लवकरच तपासणी होणार असल्याबाबत सीईओंनी सांगितले.
सीईओंच्या आदेशांचे दिव्यांग कर्मचारी संघटना प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले व त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांनी समर्थ दिले आहे.

error: Content is protected !!