संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी निघालेल्या मोर्चाच्या अनुषंगाने, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे एक खळबळजनक व्हाट्सअप चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आज बीडला येण्यापूर्वी जितेंद्र आव्हाडांनी बीड येथील शरद पवार गटाच्या एका कार्यकर्त्याला व्हाट्सअॅपवरून मेसेज केला होता, जो सोशल मीडियावर लीक झाला.
या चॅटमध्ये म्हटलं होतं की, “सर्व मसाला तयार करून ठेव मुंडे विरोधात आणि वाल्मीक विरोधात जे जे असेल ते सर्व गोळा कर, हवे तेवढे पैसे मी देतो. मोर्चामध्ये मुस्लिम आणि दलितांना गोळा कर त्यासाठी हवे तेवढे पैसे मी देतो. आंबेडकरी चळवळीतील दीपक केदार हा माझा माणूस आहे, त्यालाही मोर्चाच्या वेळी भाषणाची संधी द्या. हा मुंडे आता कसा मंत्री राहतो आणि याला अजित पक्षात कसा ठेवतो तेच मी बघतो.”
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या नेत्या ऍड. रूपाली ठोंबरे पाटील यांनी या चॅटचे स्क्रीनशॉट आपल्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केले होते आणि जितेंद्र आव्हाड यांना हे गलिच्छ राजकारण करण्यामागचा उद्देश विचारला होता.
. .नाहीतर माफी मागा- जितेंद्र आव्हाड
रुपाली पाटील ठोंबरे यांनी ती माझीच चॅटिग असल्याचं सिद्ध करून दाखवावं. जर त्यांनी सिद्ध केलं तर मी आमदारकीचा राजीनामा देईल. पण जर त्यांनी सिद्ध केलं नाही तर त्यांनी माफी मागावी असं आव्हान शरद पवार गट राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलंय. बीडमध्ये निघालेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मोर्चाच्या अनुषंगाने, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचं एक सोशल मीडियावरील चॅट वायरल झालं होतं.
दरम्यान जर सोशल मीडियावर व्हायरल झालेले चॅट माझ्या मोबाईल मधून झाले असल्याचं रुपाली ठोंबरे म्हणतात. पण हे रूपाली पाटील यांनी सिद्ध केले तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो. जर सिद्ध नाही केलं तर रूपाली पाटलांनी माफी मागावी, असं आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी दिले