अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचं सुरेश धस यांना सडेतोड उत्तर

प्राजक्ता माळीने सुरेश धस यांच्या टिप्पणीचा निषेध केला

आपण का जमलोय हा विषय तुम्हाला माहीत आहे. बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस यांनी काल प्रसार माध्यमांशी बोलताना जी टिप्पणी केली, त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मी आले आहे. दीड महिन्यापासून हा प्रकार सुरू आहे. दीड महिने मी शांतपणे सामोरे जात आहे. ट्रोलिंगला, निगेटिव्ह कमेंटला. शांतता ही माझी मूक संमती नाही,” हे अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी स्पष्ट केलंय. काल बीड जिल्ह्यातील आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचा उल्लेख केला. “सपना चौधरी, रश्मिका मंधाना, प्राजक्ता माळी असे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना करायचे असेल, त्यांनी परळीला यावे. त्यांचं शिक्षण घ्यावं आणि संपूर्ण देशात त्याचा प्रसार करावा,” असं सुरेश धस म्हणाले होते.

प्राजक्ता माळी म्हणाल्या, “माझ्यासारख्या अनेक महिला आहेत, कलाकार यांची ही हतबलता आहे. हे शांत राहणं तुमच्यामुळे आमच्यावर बेतलं आहे. एक व्यक्ती रागाच्या भरात उद्वेगाच्या भरात काही तरी बरळून जाते. त्या दोन वाक्यांचा मीडिया हजारो व्हिडीओ करून जातो. तेवढेच शब्द पकडतो. त्यावरून युट्यूब चॅनलवर हजार व्हिडीओ बनतात. त्यावर सेलिब्रिटीला बोलणं भाग पाडलं जातं.”

महिलांची अब्रू निघत राहते’

“मग ती व्यक्ती बोलते. मग दुसऱ्या व्यक्तीला वाटतं आपण बोललंच पाहिजे. मग ती बोलते. पुन्हा दुसरी व्यक्ती बोलते. आता नाही बोलली. का गप्प बसली. मग बोलणं क्रमप्राप्त होते. ही चिखलफेक सुरू राहते. महिलांची अब्रू निघत राहते. यांचं मनोरंजन होतं. हे होऊ नये. सर्व समाज माध्यमांसमोर चिखलफेक होऊ नये म्हणून मी यात पडले नाही. या गटारात दगड टाकणं योग्य वाटलं नाही,” असं प्राजक्ता माळी यांनी सांगितलं.

जाहीर माफी मागावी

प्राजक्ताने सुरेश धस यांना सुनावत म्हटलं, “बीडमध्ये कशी पुरुष कलाकार गेले नाहीत का? तुम्हा महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत नाहीत तर, तिच्या कतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत, यातून तुमची मानसिकता दिसते.” तिने मागणी केली की, “सुरेश धस यांनी माझी जाहीर माफी मागावी. माझीच नाही तर इतर अभिनेत्रींचंही त्यांनी नाव घेतलं, त्यांचीही माफी मागावी.”

प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं याचं भान नाही, हे त्यांनी शिकून घेतलं पाहिजे, असंही तिनं म्हटलं. अशा लोकांमुळे आमचं कलाक्षेत्र बदनाम होत असल्याचंही प्राजक्ता म्हणाली.

error: Content is protected !!