देशाच्या महान सुपुत्राला अखेरचा निरोप, डॉ. मनमोहन सिंग अनंतात विलीन



माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी (26 डिसेंबर) वृद्धापकाळाने निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात रात्री 9.41 वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा शासकीय दुःखवटा जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येणार आहे आणि शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर शनिवार (28 डिसेंबर) दिल्लीतील निगम बोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, रामदास आठवले, सोनिया गांधी, राहुल गांधी यांसह संपूर्ण गांधी कुटुंब उपस्थित होते. अनेक राजकीय नेत्यांनीही यावेळी हजेरी लावली.

अंतिम दर्शन

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव काल दिल्लीतील मोतीलाल नेहरू मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. आज सकाळी त्यांचे पार्थिव काँग्रेस मुख्यालयात आणण्यात आले, जिथे अनेक दिग्गजांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. यानंतर काँग्रेस मुख्यालयापासून दिल्लीतील निगम बोध घाटाकडे त्यांचे पार्थिव रवाना झाले.


Dr. Manmohan Singh, former Prime Minister, Indian economist, state funeral, Delhi, AIIMS hospital, national mourning, government protocol, political leaders, Congress headquarters, Nigam Bodh Ghat.

error: Content is protected !!