बीड: आता सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट अनिवार्य

बीड, दि. 28 (प्रतिनिधी): वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोणातून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) बसविणे आवश्यक आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाने यासंबंधी निर्देश दिलेले आहेत. यानुसार बीड जिल्ह्यातील सर्व वाहन धारकांना त्यांच्या वाहनांना HSRP बसविण्याची सूचना उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बीड यांच्या वतीने जारी करण्यात आलेल्या आहेत. केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 50 अन्वये महाराष्ट्र शासनाने सर्व वाहनांना HSRP बसविण्याची तरतूद केली आहे.

बीड जिल्ह्यात HSRP लागू करण्यासाठी कार्यवाही

How to get your HSRP for an old vehicle?

बीड जिल्ह्यासाठी M/s FTA HSRP SOLUTIONS PVT LTD ही एजंसी निश्चित करण्यात आली आहे. HSRP बसविण्यासाठी बुकिंग पोर्टल [https://maharashtrahsrp.com] हे पोर्टल निश्चित करण्यात आले आहे. वाहन धारकांनी या पोर्टलवर बुकिंग करून त्यांच्या सोयीप्रमाणे अपॉइंटमेंट घेऊन HSRP बसवून घ्यावे.

HSRP नंबर काय आहे?
खरंतर, हाय-सिक्योरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) ही एक व्हीकल लायसेन्स प्लेट आहे. जी छेडछाड-प्रतिरोधक आणि डुप्लिकेट करणे कठीण आहे.

HSRP प्लेट्समध्ये एक यूनिक आयडेंटिफिकेशन नंबर, होलोग्राम आणि रजिस्ट्रेशन नंबर असतो. ही नंबर प्लेट ॲल्युमिनियमसारख्या टिकाऊ मटेरियलपासून बनलेली आहे आणि त्यावर हॉट-स्टॅम्प केलेला अल्फा-न्यूमेरिक कोड आहे.

अशी दिसेल HSRP नंबर प्लेट

दर काय असतील?
महाराष्ट्र परिवहन विभागाने आपल्या वेबसाइटवर विविध प्रकारच्या वाहनांसाठी HSRP दर देखील नमूद केले आहेत. त्यावरही 18 टक्के दराने जीएसटी लावला जाईल

जर वाहन धारक बीड कार्यालयातील नोंदणी धारक नसला तरी काही कामानिमित्त बीडमध्ये वाहन वापरत असेल तरी देखील सदर वाहनास HSRP नंबर प्लेट बसविणे आवश्यक आहे. HSRP बसविण्यासाठी पुढीलप्रमाणे शुल्क जीएसटी वगळून आकारण्यात येणार आहे:
दुचाकी / ट्रॅक्टर: ₹450
– तीनचाकी: ₹500
– इतर सर्व वाहने: ₹745

ही तारीख असणार शेवटची नाहीतर दंड लागणार

राज्य परिवहन विभागाने (आरटीओ) २०१९पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांवर ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (एचएसआरपी) लावण्याची मोहीम अधिक तीव्र केली आहे. ३१ मार्च २०२५पूर्वी सर्व गाड्यांना ‘एचएसआर’ नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे. १ एप्रिलपासून ‘एचएसआरपी’ नसलेल्या सर्व गाड्यांवर मोटार वाहन अधिनियम १९८८ नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे



तक्रारींचे निराकरण

वाहन धारकांना त्यांच्या वाहनांवर HSRP संदर्भात काही तक्रार असल्यास संबंधित सेवा पुरवठा धारकांच्या पोर्टलवर तसेच बीड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात तक्रार दाखल करू शकतात. बीड जिल्ह्यातील नागरिकांना सूचित करण्यात येते की, त्यांच्या वाहनांवर HSRP नंबर प्लेट न बसविल्यास वाहनाचे मालकी हस्तांतरण, पत्ता बदल, वित्त बोजा चढविणे/उतरविणे, दुय्यम प्रम, विमा अद्यावत करणे इत्यादी कामकाज थांबवण्यात येतील याची नोंद घेण्यात यावी.

HSRP नसलेली वाहने, बनावट HSRP असलेली वाहने यांवर भविष्यात दंडात्मक कारवाई करण्यात येईल. असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी  Sub-Regional Transport Officer) स्वप्नील माने, बीड यांनी केले आहे.

error: Content is protected !!