शिताफीने रुग्णाला घेतले पथकाने ताब्यात
तालखेड दि .९ ( प्रतिनिधी ) गेल्या चार ते पाच दिवसात केरोनाने माजलगाव शहरात थैमान घालण्यास सुरवात केली असून पॉझिटिव्ह रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे पॉझिटिव्ह रुग्णाला ताब्यात घेण्यासाठी शहरातील जिजामाता नगर येथे प्रशासनाची टीम दाखल आल्याचे दिसताच सदरील रुग्णाने पोबारा केला परंतु पोलीस प्रशासनाच्या शिताफीने या रुग्णाला ताब्यात घेण्यात यश मिळाले.
माजलगाव शहरात केरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे जवळपास अर्ध्या शहरात कंटेन्मेंट झोन झाले आहेत.शनिवारी सर्वाधिक १९ केरोना रुग्णाचा अवहाल प्राप्त झाला त्यात शहरातील जिजामाता नगर येथील ३० वर्षीय युवकाला केरोनाचा लागण झाल्याचे निष्पन्न होताच सदरील रुग्णाला ताब्यात घेण्यासाठी रविवारी सकाळी आरोग्य सेवक,पोलीस,नगर परिषद कर्मचारी गेले असता त्याने घराबाहेर येत सुसाट धूम ठोकली रुग्ण पळल्याने यंत्रणेची चांगलीच दमछाक झाली. सदरील रुग्णाच्या कृत्याने परिसरातील नागरिक आणि यंत्रणा हैराण झाली परंतु पोबारा करत असलेल्या रुग्णाच्या पाठीमागे पोलीस आणि न प कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग करत एका तासात त्याला ताब्यात घेतले.पळ काढत असताना मात्र सदरील रुग्ण काही व्यक्तींना धडकला आहे.