अमोल मिटकरी लहान आहे, तू कोणाच्या नादी लागतोय? माझ्या नादी लागू नको, तुझे लय अवघड होईल; सुरेश धस यांचा हल्लाबोल

सुरेश धस यांचा अमोल मिटकरींवर जोरदार प्रहार

भाजप आमदार सुरेश धस यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. “अमोल मिटकरी लहान आहे.. तू कोणाच्या नादी लागतोय? या रगेलच्या नादी लागू नको.. तुझे लय अवघड होईल,” असे धस यांनी बीड येथील पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले.

सुरेश धस म्हणाले, तपासाच्या बाबतीत आणि इतर काही बाबतीत नवीन SP यांना कोण कशा पद्धतीने वागत हे सांगितलं पाहिजे. इथले काही पोलीस हे आकाने नेमणूक केल्याने संपूर्ण माहिती आकाला पुरवतात. हे होणं अत्यंत घातक आहे, पोलीस दल आरोपींना मदत करत असेल तर अवघड आहे. आकापर्यंत पोहोचेपर्यंत माहिती त्याच्यापर्यंत पोहोचते आणि आका पुढे जातो. पीक विमा, राख, गायरण जमीन ढापण्याचा पॅटर्न आम्ही सांगितलं, उद्या अजून लोकं येणार आहेत त्यांच्यासमोर अजून पॅटर्न सांगू.

संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी सापडले पाहिजेत हे आमचं मत आहे, वाचवण्यासाठी कोणीही येणार नाही. माझे आणि वाल्मिक कराड यांचे काय सुमधुर संबंध होते हे उद्या जाहीरपणे सांगणार आहे. तुमच्याबरोबर (धनजय मुंडे) देखील माझे संबंध होते, का बिघडले सांगा म्हणा. कोण अमोल मिटकरी? अमोलला माझं सांगणं आहे तू कोणाच्या ही खिशात हात घाल माझ्याकडे यायचा प्रयत्न करू नको. या आगीत तेल ओतण्याचे काम तू करू नको, असा सल्लाही भाजप आमदार सुरेश धस यांनी अमोल मिटकरी यांना दिला.

पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले, आम्ही बघत असतो रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी, सपना चौधरी यांचे जे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत, त्यांचा जवळचा पत्ता परळी पॅटर्नकडे आहे. थर्मल मधून जी राखेची गाडी निघते त्यावर कोणीतरी टोल वसूल करत आहेत. आम्ही मोर्चात सहभागी होणार आहोत. नाही आले कोणी तर धनुभाऊ आपले विमान खाली आणा. तुम्हाला पालकमंत्री व्हायचे आहे. आमचा लेकरू मेले त्याला न्याय द्यायचा. तुला कोणी घेरले आहे? हा काही राजकीय विषय नाही. या मोर्चात वंजारी समाजाचे लोक सहभागी होणार आहेत. मुस्लिम लोक सहभागी होणार आहेत.

वाल्मिक कराड यांच्याशी माझे कसे संबंध आहेत ते सांगा की मधुर आहेत, अमधुर आहेत. तुम्ही सुद्धा माझे मित्र होते. माझ्याकडे कागद आहेत. ती तारीख सांगतो, कधीपासून ते माझे मित्र राहिले नाहीत. अमोल मिटकरी लहान आहे. तू कोणाच्या नादी लागतोय? या रगेलच्या नादी लागू नको. तुझे लय अवघड होईल, असेही सुरेश धस म्हणाले.

error: Content is protected !!