लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून काही काँग्रेस उमेदवारांना अर्थसहाय्य करत असल्याचा गंभीर आरोप दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी केला आहे. BJP funding Congress candidates असा आरोप त्यांनी केला आहे. भाजपने काँग्रेस उमेदवार संदीप दीक्षित आणि फरहाद सूरी यांना कोट्यवधींचा निधी दिल्याचा दावाही आतिशींनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणासंदर्भात काँग्रेसने अजय माकन यांच्यावर 24 तासांत कारवाई करावी असा इशारा दिला आहे. अजय माकन यांच्यावर कारवाई न केल्यास **AAP threatens action** इंडिया आघाडीतील इतर घटक पक्षांशी चर्चा करून काँग्रेसची हकालपट्टी करण्याची मागणी केली जाईल, असा थेट इशारा आम आदमी पक्षाने दिला आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दिल्ली विधानसभा निवडणूक होणार आहे. **Delhi Assembly Elections** त्या आधीच आम आदमी पार्टी (AAP) आणि काँग्रेसमध्ये तणाव निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन अजय माकन यांच्यावर कारवाईची मागणी केली. काँग्रेसने तसे न केल्यास त्यांना इंडिया ब्लॉकमधून काढून टाकण्यासाठी आघाडीतील इतर पक्षांशी चर्चा केली जाईल असे सांगितले.
काय म्हणाले होते अजय माकन?
अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देणे आणि युती करणे ही चूक होती. त्यांची कोणतीही विचारधारा नाही, केजरीवाल देशद्रोही आहेत, असे वक्तव्य काँग्रेस नेते अजय माकन यांनी केले होते. त्यावर आता AAP criticizes Congress जोरदार टीका केली जात आहे.
माकन हे भाजपच्या सांगण्यावरून काम करतात
खासदार संजय सिंह म्हणाले की, अजय माकन हे भाजपकडून आलेली स्क्रिप्ट वाचतात आणि त्यांच्या सांगण्यावरून वक्तव्य करतात. माकन यांनी अरविंद केजरीवाल यांना देशद्रोही म्हटले आहे. दिल्लीतील जनतेसाठी हॉस्पिटल, शिक्षण, पाण्याची सोय करणारे केजरीवाल देशद्रोही कसे? अजय माकन यांनी कोणत्याही भाजपच्या नेत्याला या आधी देशद्रोही म्हटले नव्हते. काँग्रेस पक्षाने 24 तासांत त्यांच्यावर कारवाई करावी. जर काँग्रेसने तसे केले नाही, तर आप इंडिया आघाडीच्या नेत्यांकडे काँग्रेसला या आघाडीतून काढून टाकण्याची मागणी करेल.
काँग्रेसच्या उमेदवारांची यादी भाजपच्या कार्यालयातून आल्यासारखी वाटते
आप पक्षाला नुकसान पोहोचवण्यासाठीच हे सगळं केलं जातंय. काँग्रेसच्या संदीप दीक्षित यांना केजरीवाल यांच्या विरोधात कोण उभं करतंय? असा सवाल खासदार संजय सिंह यांनी केला.
दिल्ली विधानसभा निवडणुका
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दिल्ली विधानसभेच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. सलग तिसऱ्यांदा सत्ता काबीज करण्यासाठी अरविंद केजरीवालांच्या आप पक्षाने कंबर कसली आहे. तर दिल्ली कोणत्याही परिस्थितीत आपल्या हाती घ्यायचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे.
इंडिया आघाडीचा भाग
अरविंद केजरीवाल यांचा पक्ष लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचा भाग होता. **Lok Sabha Elections** आपने आणि काँग्रेसने चंदीगड, दिल्ली, हरियाणा, गोवा आणि गुजरातमध्ये एकत्र निवडणुका लढवल्या होत्या. पण पंजाबमध्ये पक्षाने काँग्रेसविरुद्ध निवडणूक लढवली. त्या आधी दिल्ली विधानसभा निवडणुकीतही आप पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढवून सत्ता काबीज केली होती.
–