पंकजा मुंडे यांचे मोठे विधान ‘पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी पीएम मोदींची….’

महालक्ष्मीच्या आशीर्वादाशिवाय कोणतेही काम करू शकत नाही. माझ्याकडे आलेले खाते हे या सृष्टीला वाचवण्यासाठी योगदान देणारे आहे. गेल्या वेळेस मी आले होते, त्यावेळी येथे पूर आला होता. पर्यावरण खात्याच्या माध्यमातून येथे पूर कसा येणार नाही, यासंदर्भात आम्ही प्रयत्न करणार आहोत. याशिवाय प्रदूषण मुक्त नदी अंतर्गत पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी मी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी कोल्हापूर येथील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी साखरशाळा संदर्भात मी अद्याप आढावा घेतला नाही. मात्र, ऊसतोड कामगारांसोबत त्यांची मुले गावातच राहतात. त्यांची तिथे राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था आहे. मी मराठवाड्यात झालेल्या सर्वेक्षण अद्याप पाहिलेला नाही, ते कितपत खरं आहे हे मी पाहिलेलं नाही. मात्र, सरकारी शाळांचं शिक्षण सुधारण्यासाठी त्याच्या खात्याकडून योगदान झाले तर चांगलं होईल. शिक्षण पद्धतीमध्ये आणखी बदल करण्यात येतील, असेही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

मुंबई, पुणे मेट्रोसिटी आहेत आणि येथे प्रदूषण वाढलेले आहे याचे अनेक कारणे आहेत. या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात काम सुरू आहेत. त्यामुळे हे काही क्षणासाठी प्रदूषण असेल. यामध्ये मी स्वतः लक्ष घालणार आहे. त्याशिवाय अनेक कारखान्यांकडून प्रदूषण होत आहे, याकडे मी लक्ष देणार असल्याचे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!