आजपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणारमुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार

विधानसभा निवडणुकीनंतर आता पहिल्यांदा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत. यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. डिसेंबर महिन्याच्या अंतिम आठवड्यात सर्व पैसे दिले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात 35 लाख महिलांना लाभ मिळणार आहे. त्यानंतर उर्वरित महिलांना पैसे दिले जाणार आहेत. योजनेसाठी लागणारा 3500 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळणार की 2100 रुपये, याचेही स्पष्टीकरण झाले आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीआधी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) जाहीर केली होती. राज्यात ही योजना प्रचंड लोकप्रिय झाली. जवळपास अडीच कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले. त्यानंतर जुलैपासून या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये देण्यास सुरुवात झाली. तसेच नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्रित देण्यात आले होते.

राज्यात लाडकी बहीण योजनेचा मोठा फायदा महायुतीला मिळाला. महायुतीला विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाले. महायुतीचे 230 जागांवर उमेदवार निवडून आले. भाजपला प्रथमच 132 जागा मिळाल्या. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 57 जागांवर तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 41 जागांवर विजय मिळाला. महायुतीने लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवण्याची घोषणा विधानसभा निवडणुकीत केली होती. त्यानुसार आता लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्यापासून वाढीव 2100 रुपये मिळणार की 1500 रुपयेच देण्यात येणार, याचे स्पष्टीकरण झाले आहे.

error: Content is protected !!