धनंजय मुंडेंना सातपुडा बंगला आणि पंकजा मुंडे यांना….;

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप

खातेवाटपानंतर आता मंत्र्यांना मंत्रालयातील दालनांचे आणि सरकारी बंगल्यांचेही वाटप करण्यात आले आहे. विधानपरिषद सभापती राम शिंदे यांना ज्ञानेश्वरी बंगला, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना शिवगिरी बंगला, आणि भाजप प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगला देण्यात आला आहे.


### बंगल्यांचे वाटप:

– राम शिंदे: ज्ञानेश्वरी
– राहुल नार्वेकर: शिवगिरी
– चंद्रशेखर बावनकुळे: रामटेक
– राधाकृष्ण विखे पाटील: रॉयलस्टोन
– पंकजा मुंडे: पर्णकुटी
– शंभूराज देसाई: मेघदूत
– गणेश नाईक: पावनगड
– धनंजय मुंडे: सातपुडा
– चंद्रकांत पाटील: सिंहगड
– गिरीश महाजन: सेवासदन
– गुलाबराव पाटील: जेतवन
– मंगलप्रभात लोढा: विजयदुर्ग
– उदय सामंत: मुक्तागिरी
– जयकुमार रावल: चित्रकूट
– अतुल सावे: शिवगढ़
– अशोक उईके: लोहगड
– आशिष शेलार: रत्नसिषु
– दत्तात्रय भरणे: सिध्दगड
– अदिती तटकरे: प्रतापगड
– शिवेंद्रराजे भोसले: पन्हाळगड
– माणिकराव कोकाटे: अंबर-२७
– जयकुमार गोरे: प्रचितीगड
– नरहरि झिरवाळ: सुरुचि ०९
– संजय सावकारे: अंबर-३२
– संजय शिरसाठ: अंबर-३८
– प्रताप सरनाईक: अर्वतो-५
– भरत गोगावले: सुरुचि ०२
– मकरंद पाटील: सुरुचि-०३

मंत्र्यांना त्यांच्या बंगल्यांचे वाटप करण्यात आले असून, काही मंत्र्यांमध्ये नाराजीची भावना दिसून येत आहे. तथापि, बहुतांश मंत्र्यांना त्यांचेच बंगले अलोट करण्यात आले आहेत.

error: Content is protected !!