जिल्हा परिषदेच्या लेखा व वित्त विभागातील 18 अधिकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती;
10 वरिष्ठ सहाय्यक लेखा, सहाय्यक लेखाधिकारी 3, तर कनिष्ठ लेखाधिकारीपदी 5 जणांची नियुक्ती
बीड दि.23 (प्रतिनिधी):
जिल्हा परिषदेतील पदोन्नती समितीने केलेल्या शिफारशीनुसार जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील 18 कर्मचारी, अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांनी दोन वर्षापासून रखडलेल्या या पदोन्नती केल्यामुळे अनेकांनी स्वागत केले आहे. पदोन्नतीधारकांनी जिल्हा परिषद सीईओ व कॅफो यांचे आभार व्यक्त केले आहेत.
या संदर्भात माहिती अशी की, गेल्या दोन वर्षापासुन जिल्हा परिषदेतील वित्त विभागातील पदोन्नत्या दबावामुळे व झंझट नको म्हणून रखडल्या होत्या. शासन निर्देशानुसार योग्य पद्धतीने पदोन्नत्या करण्याबाबत विभागामार्फत प्रक्रिया सुरू होती. अखेर आयएएस आदित्य जीवने यांनी संबंधित विभागांना नियमानुसार पदोन्नत्या देण्यासाठीची कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शुक्रवार दि.20 रोजी जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील 18 अधिकारी, कर्मचाऱ्याधिकांना पदोन्नती देण्यात आली आहे.
सहाय्यक लेखाधिकारी पदावर आर.बी. सरोदे, पंचायत समिती बीड, गायके एस. आर. वित्त विभाग जि. प.बीड आणि गायकवाड ए.जी.यांना शिक्षण विभागात पदोन्नती देण्यात आली आहे. वरिष्ठ सहाय्यक पदावरील 05 कर्मचाऱ्यांना कनिष्ठ लेखा अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये राठोड डी.आर. पंचायत समिती वडवणी, कुडके ए.पी.,वित्त विभाग, कुलकर्णी एम. व्ही. वित्त विभाग आणि श्रीमती तपसे पी.एच. माजलगाव, सय्यद ए.एस. यांना पंचायत समिती गेवराई येथे पदोन्नती देऊन पदस्थापना देण्यात आली आहे. कनिष्ठ सहाय्यक या पदावरील 10 जणांना वरिष्ठ सहाय्यकपदी पदोन्नती देण्यात आली आहे.
यामध्ये एम.बी. महाजन वित्त विभाग, शेलार एस. एस. ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, शेवाळे एस. जी., पंचायत विभाग, जिल्हा परिषद बीड, श्रीमती मस्के एस.एम., कृषी विभाग, जिल्हा परिषद, श्रीमती डोळे एस जे. पंचायत समिती, धारूर , मोगल यु.पी., वित्त विभाग, जिल्हा परिषद,बीड, तुरुकमारे पी.एस. शिक्षण विभाग, जिल्हा परिषद,बीड, क्षीरसागर जी.एन. वित्त विभाग, सराफ पी.जी., वित्त विभाग, शिंदे एस.एस., वित्त विभाग बीड याप्रमाणे नियुक्ती देण्यात आली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने, आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुरेश केंद्रे यांनी गेल्या अनेक दिवसापासून रखडलेल्या पदोन्नती दिल्यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.