कल्याणमध्ये पुन्हा हिंसक घटना: मराठी कुटुंबावर परप्रांतीयांचा हल्ला

Kalyan, 22 डिसेंबर 2024

Kalyanच्या एका हायप्रोफाइल सोसायटीमध्ये तीन दिवसांपूर्वी दोन परप्रांतीय कुटुंबांकडून एका मराठी कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली होती. विशेष म्हणजे बाहेरून गुंड बोलावून मराठी कुटुंबाच्या घरात घुसून लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. या प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली, मराठी माणसांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली. या घटनेचे पडसाद विधानसभेतदेखील उमटले. त्यानंतर Police ने या प्रकरणातील आरोपींना अटक केली. न्यायालयाने या प्रकरणातील आरोपींना सहा दिवसांची Police कोठडी सुनावली आहे.

पुन्हा एकदा Kalyan मध्ये हिंसा

दरम्यान, ही घटना ताजी असतानाच आता Kalyanमध्ये पुन्हा एकदा अशीच घटना घडली आहे. परप्रांतीय कुटुंबाकडून मराठी कुटुंबाला पुन्हा एकदा बेदम मारहाण करण्यात आली आहे. Uttam Pandey असे मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या पत्नीने देखील मारहाण केली आहे. Marathi तरुण, त्याची पत्नी आणि आईला मारहाण करण्यात आली आहे. या घटनेत हे तिघेही जखमी झाले आहेत. दरम्यान, ही घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. या प्रकरणात मारहाण करणाऱ्या व्यक्ती Uttam Pandey आणि त्याच्या पत्नीविरोधात Manpada Police Station मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ज्याला मारहाण करण्यात आली तो तरुण Police कर्मचारी आहे.

Policeनी दिलेली माहिती

घटनेबाबत Policeनी दिलेल्या माहितीनुसार, चार वर्षांच्या मुलीचा Molestation करण्यात आला होता. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या कुटुंबाला Pandey आणि त्याच्या पत्नीकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी Manpada Police Station मध्ये Uttam Pandey आणि त्याच्या पत्नीविरोधात विविध sections अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती Police कडून देण्यात आली आहे.

Police ही सुरक्षित नाहीत?

तीन दिवसांपूर्वी Kalyan मधीलच एका Marathi कुटुंबावर दोन परप्रांतीय कुटुंबांकडून attack करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा अशीच घटना घडली आहे. Police च्या कुटुंबाला मारहाण करण्यात आली आहे. त्यामुळे आता Policeही सुरक्षित नाहीत का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

error: Content is protected !!