माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह MIM च्या 30 आंदोलकांवर गुन्हे दाखल

Maharashtra Politics: राज्यसभेत गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटले. राज्यात छत्रपती संभाजीनगरसह अनेक ठिकाणी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांसह विरोधक एकवटले होते. जोडे मोरो आंदोलनासह विरोधक आक्रमक झाले होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये केलेल्या आंदोलनादरम्यान गाढवाचा वापर करण्यात आल्याचा आक्षेप घेत माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांच्यासह एमआयएम पक्षाच्या 30 आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन करताना जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि गाढवाचा वापर केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल झाले आहेत.

अमित शाह यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत जलील आणि त्यांच्या समर्थकांनी आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान गाढवाचा वापर करण्यात आला, ज्यामुळे पोलिसांनी यावर आक्षेप घेत गुन्हा दाखल केला आहे. आंदोलकांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!