सचिन उबाळे यांच्यामुळे ठेवीदारांच्या प्रश्न विधानसभेत पोहोचला; आ. धस यांनी सभागृहात मांडला ठेवीदारांचा प्रश्न


धस यांनी सभागृहात मांडला ठेवीदारांचा प्रश्न, उपमुख्यमंत्र्यांकडून आश्वासन

प्रतिनिधी | बीड

मराठवाड्यासह बीड जिल्ह्यातील विविध मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकांनी मोठ्या प्रमाणावर ठेवीदारांच्या ठेवी बुडवलेल्या आहेत. यासंदर्भात ठेवीदार महाराष्ट्र राज्य संघर्ष कृती समितीचे मुख्य प्रवर्तक प्रा. सचिन उबाळे यांनी भाजपचे आमदार सुरेश धस यांना पत्र पाठवले होते. या पत्राच्या आधारे आमदार सुरेश धस यांनी शनिवारी बीड येथील ठेवीदारांचा तत्काळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दखल घेऊन या संदर्भात बैठक लावण्याचे आदेश दिले आहेत.



जिल्ह्यातील जिजाऊ मल्टिस्टेट, ज्ञानराधा मल्टिस्टेट, साईराम मल्टिस्टेट, मातोश्री, राजस्थानी, मराठवाडा अर्बन माजलगाव या मल्टिस्टेट संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या असून सर्वसामान्यांना या मल्टिस्टेटने ठेवी वितरित केलेल्या नाहीत. याप्रकरणी ठेवीदार संघर्ष कृती समितीचे मुख्य प्रवर्तक प्रा. उबाळे यांनी ठेवीदारांना बरोबर घेऊन आंदोलने केली. सहकार आयुक्त (पुणे), उपनिबंधक कार्यालय (बीड) यांना निवेदन दिले आहे. परंतु अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही. याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी प्रा. उबाळे यांनी उपोषण केले आहे. ठेवी अडकल्यामुळे काही ठेवीदारांचे उपचाराअभावी निधन झाले. शिक्षण, मुलींच्या लग्नासाठी पैसा नसल्याने पालकांना खासगी सावकारांकडे जाण्याची वेळ आली आहे.

मराठवाड्यात ५५०० कोटींच्या ठेवी

मराठवाड्यात १६ लाख ठेवीदार असून त्यात एकट्या बीड जिल्ह्यातील ठेवीदारांची संख्या १ लाख २६ हजार आहे. ठेवी वेळेवर न मिळाल्याने आजपर्यंत २६ जणांचा विविध आजाराने व धास्तीने मृत्यू झालेला आहे. प्रा. सचिन उबाळे, मुख्य प्रवर्तक, ठेवीदार संघर्ष कृती समिती, महाराष्ट्र

शहरातील भीमाशंकर माडेकर या तरुणाने आपले पैसे मिळत नसल्याने बिंदुसरा तलावात आत्महत्या केली. त्यामुळे याप्रकरणी विधानसभेमध्ये वाचा फोडावी, अशी मागणी सचिन उबाळे यांनी आमदार धस यांच्याकडे केली होती.

error: Content is protected !!