उपमुख्यमंत्री मस्साजोगमध्ये: देशमुख कुटुंबियांना अजित पवारांचा ठाम निर्धार

संतोष देशमुख हत्या प्रकरण: अजित पवारांचा ठाम निर्धार

बीड, 21 डिसेंबर 2024

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संसदेत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी विधीमंडळात या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने व्हावा आणि आरोपींना तात्काळ अटक व्हावी, अशी मागणी केली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप करण्यात येत आहे, त्यामुळे या प्रकरणाची चर्चा राज्यभरात होत आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार देखील मस्साजोग गावात दाखल झाले. अजित पवार यांनी देशमुख कुटुंबियांना दिलासा देत, “संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड कोण असेल, त्याला सोडणार नाही,” असा ठाम निर्धार व्यक्त केला.



अजित पवार म्हणाले, “संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली आहे. त्याचे दुःख सगळ्यांना आहे. इथे कुणाचाही राजकीय हस्तक्षेप होणार नाही. दोषींना फाशीची शिक्षा होणार आहे. याबाबत बऱ्याच चर्चा होत आहेत. कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल, अशी चर्चा आहे. पण मुख्यमंत्र्यांनी चौकशीचा निर्णय घेतला आहे. यात कोणतीही त्रुटी राहणार नाही. मी सरकारच्या वतीने संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या प्रकरणाचा संपूर्ण तपास पूर्ण होईपर्यंत कुणालाही सोडले जाणार नाही.”

अजित पवार यांच्या या ठाम भूमिकेमुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळण्याची आशा वाढली आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आणि दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी
अजित पवार यांनी देशमुख कुटुंबियांशी चर्चा करून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितले की, “ही घटना फार वेदनादायी, माणुसकीला काळीमा फासणारी आहे. संतोष यांच्या हत्येची न्यायालयामार्फत तसेच कुणाचाही दबाव येऊ नये, यासाठी आयजी लेव्हलच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमार्फतही चौकशी करत आहोत.”

अजित पवार यांनी आश्वासन दिले की, “संतोष देशमुख यांचे मारेकरी तसेच या मागचा मास्टरमाइंड कोणीही असला, तरी त्यांना सोडणार नाही. तुम्ही अजिबात घाबरू नका. वेळ पडल्यास तुम्हाला पोलिस बंदोबस्त देऊ.” शिवाय त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यायला आपण तयार असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले.

मी स्वत: लक्ष देईल, अजित पवारांचा शब्द
अजित पवार यांनी ग्रामस्थांशी बोलताना सांगितले की, “संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील तपासात कुठल्याही परिस्थितीत राजकीय हस्तक्षेप होणार नाही. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होऊन दोषींना फाशीची शिक्षा होईल. या मागील मास्टरमाइंड जो कुणी असेल, त्याला सोडणार नाही.”

अजित पवार यांनी मस्साजोग ग्रामस्थांना खात्री दिली की, “या प्रकरणात वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. त्यातून कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संपूर्ण प्रकरणावर सरकारचे आम्हा सर्वांचे बारकाईने लक्ष आहे. या प्रकरणाचा संपूर्ण तपास होईपर्यंत मी व्यक्तीश: त्याठिकाणी लक्ष देईन आणि कुणालाही सोडले जाणार नाही.”

अजित पवार यांच्या या ठाम भूमिकेमुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळण्याची आशा वाढली आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आणि दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे

error: Content is protected !!