अजित पवारांच्या गाडीतून धनंजय मुंडेंचा प्रवास

अजित पवारांच्या गाडीतून धनंजय मुंडेंचा प्रवास

वाल्मिक कराड यांच्यावर आरोप झाल्यानंतर मागील चार ते पाच दिवसांपासून धनंजय मुंडे माध्यमांपासून दूर होते. काल रात्री उशिरा धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि या सर्व प्रकरणात दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार असल्याचे त्यांनी म्हटले. वाल्मिक कराड प्रकरणामुळे धनंजय मुंडे अडचणीत येणार का, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.

आज सकाळी धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला विजयगड या निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर अजित पवारांच्या गाडीतून धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी रवाना झाले आहेत. त्यामुळे आता धनंजय मुंडे पुन्हा एकदा सक्रीय झाले असल्याचे दिसून येत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर खातेवाटप होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

error: Content is protected !!