धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात वाल्मिक कराडवर आरोप झाल्यानंतर मुंडे अजित पवारांची भेट घेण्यासाठी आले आहेत. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
सभागृहात वाल्मिक कराडच्या उल्लेखानंतर धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे, त्यामुळे या भेटीचे महत्त्व अधिक वाढले आहे.