सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर आरोप



सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, अजित पवारांकडे त्यांनी आधीच पिक विमा घोटाळ्याबाबत माहिती दिली होती. बीड जिल्ह्यात ७००० हेक्टर आणि धाराशिवमध्ये ३००० हेक्टरचा घोटाळा सापडला आहे. याबाबतची कागदपत्रे लवकरच त्यांच्या हाती येणार आहेत. सोनपेठ तालुक्यात १३,१९० हेक्टरमध्ये विमा भरला गेला आहे, आणि विमा भरणारे सीएससी सेंटर परळी तालुक्यातील आहे.

धस यांनी स्पष्ट केले की, ते परळी तालुक्यातील सर्व जनतेला किंवा शेतकऱ्यांना दोष देत नाहीत, परंतु या योजनेचा गैरफायदा घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. २०२३ मध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. महायुतीच्या काळात तत्कालीन कृषीमंत्री यांनी एक रुपयात पिक विमा योजनेचा किती गैरफायदा घेतला हे त्यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंवर निशाणा साधत सांगितले आहे.

error: Content is protected !!