जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार
संतोष देशमुख यांना जबर मारहाण करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यांच्या अंगावर विविध ठिकाणी मुका मार दिल्याने अतिरक्तस्राव झाला असून, त्यामुळे ते शॉकमध्ये गेल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष देशमुख यांच्या मृत्यूचे कारण ‘हॅमरेज अॅण्ड शॉक ड्यू टू मल्टिपल इन्जुरिज’ असे नमूद करण्यात आले आहे.
देशमुख यांच्या छाती, हात-पाय, चेहरा आणि डोके या भागात मारहाण करण्यात आली होती. त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्याचा भाग मारहाणीमुळे काळा-निळा पडला होता. त्यामुळे मारेकऱ्यांनी संतोष देशमुख यांचे डोळे जाळून टाकल्याची चर्चा आहे.
या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे.