महायुती सरकारने १५ डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार केला होता. यावेळी ३२ कॅबिनेट आणि ७ आमदारांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. यामध्ये भाजपच्या २१, शिवसेना १२ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० आमदारांचा समावेश होता. खातेवाटपाची उत्सुकता लागली होती आणि आता खातेवाटपाची माहिती समोर आली आहे.
अजित पवारांच्या मंत्रिमंडळात कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळणार ?:
- सहकार: मकरंद पाटील
- अर्थ व नियोजन: अजित पवार
- महिला व बालकल्याण: आदिती तटकरे
- कृषी: दत्तामामा भरणे
- वैद्यकीय शिक्षण: हसन मुश्रीफ
- अन्न व नागरी पुरवठा: धनंजय मुंडे
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थ, उत्पादन शुल्क, सहकार, कृषी ही तगडी खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली आहेत. राज्य उत्पादन शुल्क हे खाते नव्याने राष्ट्रवादीला मिळेल, असे सांगितले जात आहे. राज्य उत्पादन शुल्क हा विभाग अजित पवार स्वतःकडे ठेवणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
खातेवाटपासोबतच प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कोणाला मिळणार, याचीही उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे. त्यामुळे आगामी काळात या खातेवाटपामुळे राज्याच्या राजकारणात काय बदल होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.