आव्हाडांच्या भाषणादरम्यान भाई जगताप आणि संदीप क्षीरसागर यांची रेकॉर्डिंग व्हायरल
बीड, दि. १६ (प्रतिनिधी): जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंचांच्या हत्येच्या प्रकरणी नागपूरच्या सभागृहाबाहेर जितेंद्र आव्हाड बोलत असताना त्यांच्या बाजूला संदीप क्षीरसागर आणि भाई जगताप उभे होते. आव्हाडांचे बोलणे चालू असताना संदीप क्षीरसागर आणि भाई जगताप यांच्यातील चर्चा कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे.
संदीप क्षीरसागर म्हणाले, “माझ्या जिल्ह्यातील विषय आहे, मी बोलू का?” यावर भाई जगताप म्हणाले, “असला तरी इथला काही प्रोटोकॉल आहे.”
संदीप क्षीरसागरांनी प्रोटोकॉलची आठवण करून दिली. त्यावर संदीप क्षीरसागर म्हणाले, “झणझणीत विषय आहे.” तेंव्हा भाई जगताप म्हणाले, “असे शंभर विषय आहेत इथे. इथला काही प्रोटोकॉल आहे, विरोधी पक्षनेत्यांना आधी बोलू द्या.”
भाई जगताप आणि संदीप क्षीरसागर यांची ही रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.