छगन भुजबळ यांचं मंत्रिपद हुकल्यानंतर मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात का? घेतलं नाही, हा आमचा प्रश्नच नाही. तर आरक्षणाच्या मारेकऱ्याचंं आम्हाला काही देणं घेणं नाही. असं म्हणतं मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर जास्त बोलणं टाळलं आहे.
मनोज जरांगे पूढे म्हणाले, महायुती सरकारने या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा अशी अपेक्षा मनोज जरांगेंनी व्यक्त केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलल्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी देखील मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.