लक्ष्मण हाके यांचा खळबळजनक दावा: छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर यांचे मंत्रीपद डावलले
छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर यांचे नाव घेत लक्ष्मण हाके यांनी खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. हाके यांनी म्हटले आहे की, ओबीसी नेते छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर यांचे मंत्रीपद फक्त अजित पवारांमुळे डावलण्यात आले आहे. पवारांनी याचे उत्तर द्यावे नाहीतर उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री बनवावे.
मंत्रिमंडळात १५ ते १६ ओबीसी नेत्यांना शपथ दिली असली तरी ओबीसीचा मुख्य आवाज छगन भुजबळ यांना का डावलण्यात आले, याचे उत्तर अजित पवारांनी द्यावे. नाहीतर उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री बनवावे, अशी मागणी हाके यांनी केली आहे. तसेच, रोहित पवार आणि जयंत पाटील यांना सत्तेत घ्यायचे होते, म्हणून छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्याचा आरोपदेखील हाके यांनी केला आहे.
दरम्यान, रविवारी फडणवीस सरकारच्या ४२ मंत्र्यांनी शपथ घेतली. एक मंत्रीपद रिक्त ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या मंत्रीपदावर कोणाची वर्णी लागणार हे अद्याप समजू शकलेले नाही. राष्ट्रवादीकडे हे मंत्रीपद जाणार का, अशा चर्चा रंगल्या आहेत.