महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार: पंकजा मुंडे यांना मंत्रीपद
नागपूर, दि. १५ (प्रतिनिधी): आज नागपूरमध्ये महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा संपन्न झाला. यामध्ये तिन्ही पक्षांच्या ३९ नेत्यांनी शपथ घेतली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. भाजपकडून पंकजा मुंडे यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली. पंकजा मुंडे शपथ घेताना समोर बसलेल्या कार्यकर्त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचा जयघोष केला, “अमर रहे अमर रहे गोपीनाथ मुंडे अमर रहे” अशा घोषणा देण्यात आल्या.
आज नागपूरमध्ये राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. यावेळी तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी शपथ घेतली. यामध्ये सर्व पक्षांच्या मिळून ३९ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. पंकजा मुंडे यांना देखील मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे या सध्या विधानपरिषदेच्या आमदार आहेत.
पंकजा मुंडे यांच्या शपथविधीमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी त्यांच्यावर दाखविलेल्या विश्वासामुळे पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.