राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP Cabinet Minister List) अदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तात्रय भरणे, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील, इंद्रनील नाईक, धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद निश्चित झालं आहे. तर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचं नाव मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे. राष्ट्रवादीकडून मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्यांची नावं समोर आली आहे.
राष्ट्रवादीकडून आतापर्यंत सात मंत्र्यांची नावं जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या यादीत छगन भुजबळ यांना डच्चू देण्यात आला आहे. धनंजय मुंडे यांचंही नाव नव्हतं. मात्र ऐनवेळी धनंजय मुंडे यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे.तसेच मंत्र्यांच्या यादीत दिलीप वळसे,धर्मराव अत्राम,अनिल पाटील यांनांही मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना विचारले असता त्यांनी अजित पवार यांच्याकडे चेंडू टोलावला. तर अजित पवारांनीही उरलेल्या दोन नावांवर बोलण्यास नकार दिला. मंत्री ठरवायचा अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आहे, असं म्हणत अजित पवारांनी पत्रकारांच्या प्रश्नाला बगल दिली, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादीकडून कोणा कोणाला मंत्रिपदासाठी फोन-
1. आदिती तटकरे
2. बाबासाहेब पाटील
3. दत्तमामा भरणे
4. हसन मुश्रीफ
5. नरहरी झिरवाळ
6. मकरंद पाटील
7. इंद्रनील नाईक
8. धनंजय मुंडे
9. माणिकराव कोकाटे