प्रतिनियुक्तीचा कालावधी पूर्ण; डेप्युटी सीईओ केकान कार्यमुक्त

प्रतिनियुक्तीचा कालावधी पूर्ण; जि.प.च्या महिला आणि बालकल्याण’चे डेप्युटी सीईओ केकान कार्यमुक्त

बीड दि.3 (प्रतिनिधी):
बीड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकान यांना दि. 2 डिसेंबर रोजी प्रतिनियुक्तीचा कालावधी संपल्यामुळे राज्य शासनाच्या आदेशानुसार कार्यमुक्त करण्यात आले आहे.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकान यांची 28 जून 2021 रोजी बीड येथे नियुक्ती करण्यात आली होती. राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने त्यांची बीड जिल्हा परिषदेत जिल्हा बालविकास अधिकारी (महिला व बालविकास विभाग) म्हणुन नियुक्ती केली होती. ठिकाण यांच्या प्रतिनियुक्तीचा कालावधी संपल्यामुळे ते आता मुंबईतील कार्यात रुजू होणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागात दिनांक 5 जून 2016 ते 4 जून 2020 पर्यंत यापूर्वी त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. जिल्ह्याचे भूमिपुत्र असल्यामुळे केकान वयांच्या ओळखीचा आणि व्यक्तिमत्वाचा लाभ या विभागाच्या योजना आणि उपक्रम राबविण्यासाठी झाला आहे.

error: Content is protected !!