बीड जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ

बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक मसुरी प्रशिक्षणासाठी जाणार

बीड, दि. २८: बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक २ ते २७ डिसेंबर या कालावधीत प्रशिक्षणासाठी मसुरीला जात आहेत. या काळात बीड जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे असणार आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी हे आदेश जारी केले आहेत. अविनाश पाठक यांची मसुरी येथील मींड करिअर ट्रेनिंगसाठी निवड झाली आहे, त्यामुळे ते या प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणार आहेत.

या बदलामुळे बीड जिल्ह्यातील प्रशासनात काही काळासाठी बदल होणार आहे. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या अनुपस्थितीत श्रीकृष्ण पांचाळ बीड जिल्ह्याची जबाबदारी संभाळणार आहेत.

error: Content is protected !!