राज्यभरातील अनेक शहरांच्या किमान तापमानात घट झाली आहे. गेल्या दोन, तीन दिवसांपासून राज्यभरात थंडीचा जोर वाढला आहे. बंगालच्या उपसागरात फेंगल हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणात बदल झाला आहे. या चक्रीवादळामुळे दक्षिण भारतात पावसाची शक्यता आहे. राज्यात पुण्याच्या तपमानाने या वर्षाचा निचांक नोंदवला. पुण्याचे तापमान ९.९ अंशावर आले. मुंबईचे किमान तापमान १६ अंश नोंदवले गेले आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे, हवामान विभागातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर यांनी ही माहिती दिली.