मुंडेंचे मीठच आळणी धसांचे आरोप ओबीसींच्या जिव्हारी
आष्टी विधानसभा मतदार संघात भाजपची उमेदवारी सुरेश धस यांना मिळवून देण्यामध्ये ज्याची महत्त्वाची भूमिका राहिली, केवळ उमेदवारी दिली नाही तर दोन प्रचार सभा घेतल्या असे असताना निवडून आलेले आ. सुरेश धस यांनी काल विजयाचा गुलाल अंगावर पडताच आपल्याच नेतृत्वाला बुका लावल्याचे काम केले. त्यामुळे संपूर्ण मतदार संघात नव्हे तर राज्यभरातील ओबीसी समाजात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. अगोदरच केवळ ओबीसी असल्यामुळे पंकजाताईंना लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचा रोष पत्करावा लागला होता. तो जिव्हारी लागलेला पराभव विसरुन ताईनी फक्त आम्ही, माजलगाव, गेवराई मध्येच नाही तर महाराष्ट्रातील २७ मतदार संघात मराठा समाजाच्या उमेदवारांचा प्रचार केला. त्यापैकी २३ आमदार निवडून सुध्दा आले. यामध्ये बहतांश मराठा समाजाचे आहेत. मात्र उपकाराची फेड अपकाराने कमी करावी? बाचे उदाहरण आ. सुरेश धस यांनी दाखवून दिले.
काय बोले आ. धस
काल विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहिर झाल्यानंतर महायुतीचा महाविजय साजरा करण्यात आला. संपूर्ण राज्याचे लक्ष पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाकडे होते. ताईचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पक्षाने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. ज्यामुळे स्व. मुंडे आणि पंकजाताई यांना मानणारा महाराष्ट्रातील वर्ग एका अर्थी समाधानी झाला आणि ती महायुतीसोबत एकसंधपणे उभा राहिला.
बीड जिल्हयातील सहा पैकी पाच विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार होते. परंतु पंकजाताईनी आग्रह करून आहीची जागा भाजपच्या पदरात पडून घेतली. तरी देखील त्या ठिकाणी अजित पवार यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार भाजपच्या विरोधात उभा का केला? या मागे कोणाचे षडयंत्र होते? हे धस विचारत नाहीत. त्या उलट ज्यांनी उमेदवारी दिली, दोन प्रचारसभा घेतल्या, तोंड भरून कौतुक केले, त्या पंकजाताईच्या विषयी निवडून देताच कृतज्ञता न दाखवणे मतदारांना आवडले नाही. काल विजयानंतर झालेल्या सभेत बोलतांना आ.धस यांनी पंकजाताई यांच्याविषयी अत्यंत खालच्या पातळीला जाणून टीका केली. कालपर्यंत जे त्यांना ताईसाहेब म्हणत होते तेच काल पंकूताई मागू लागले. रंग बदलण्याची मर्यादा असते. जर पंकजाताईच्या मनात नसते तर त्या उपद्रपणे तुमच्या प्रचारात आल्या त्या रामराव खेडकर, र, सुरेश उगलमुगले, प्रकाश खेडकर अगी काही बोटावर मोजण्या एवढे वंजारी समाजाचे नेते ताईच्या परवानगी शिवाय जर तुमचा प्रचार करत होते असे आपल्याला वाटत असेल तर एकदा समाजाला जाऊन तुम्ही विचारा.
सुरेश धस यांच्या विजयाला त्यांनी केलेल्या भाषणामुळेनामुळे दृष्ट लागली आहे. हा विषय फक्त बीड जिल्हयापुरता नव्हे तर महाराष्ट्रभर गेला असून मुंडेंचे मीठ आळनी आहे, कितीही मोठे केले तरी त्याची परतफेड अशीच होते हे काल पुन्हा एकदा सिध्द झाले.