महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे आणि राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला असून, मविआमधील तिन्ही पक्षांना मिळून ६० जागा देखील जिंकता आलेल्या नाहीत.
दुसऱ्या बाजूला, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मोठी मुसंडी मारली आहे. त्यांच्या पक्षाने राज्यात ५७ जागा जिंकल्या आहेत. एकनाथ शिंदे यांचा पक्षाला महायुतीच्या जागावाटपात ८५ जागा मिळाल्या होत्या, त्यापैकी ५७ जागांवर शिंदेंचे शिलेदार विजयी झाले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी दावा केला होता की, त्यांच्याबरोबर बंड करणाऱ्या सर्व आमदारांना पुन्हा निवडून आणणार. एकनाथ शिंदे यांनी त्यांचा शब्द राखला आहे. त्यांच्याबरोबर गेलेले जवळपास सर्वच आमदार (सदा सरवणकर वगळता) विजयी झाले आहेत.