८ दखलपात्र तर ४ अदखलपात्र गुन्ह्यांचा समावेश
प्रतिनिधी | बीड
जिल्ह्यात आचारसंहितेच्या काळात निवडणुकीशी संबंधित २२ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यातील ८ गुन्हे हे दखलपात्र आहेत तर, ४ गुन्हे अदखलपात्र असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी दिली.
जिल्ह्यात १५ ऑक्टोबर पासून आचारसंहिता सुरु झाली. तेंव्हापासून पोलिस प्रशासनाकडून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विविध मोहिमा राबवल्या प्रशासनानेही आचारसंहिता भंग प्रकरणी कारवाईचा बडगा उगारला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कडक भूमीका घेऊन गुन्हे नोंद करण्यात आले
आहेत. उमेदवारांना प्रचारापासून अडवणे असे प्रकार जिल्ह्यात घडले आहेत. अशा प्रकरणांत पोलिसांनी स्वतः तक्रारदार होऊन गुन्हे नोंद केले आहेत. आचारसंहितेच्या काळात निवडणुकीशी संबंधित २२ गुन्हे नोंद झाले आहेत. यातील १८ दखलपात्र तर ४ अदखलपात्र आहेत. २२ पैकी आचारसंहिता भंगाचे ९ गुन्हे नोंद आहेत. दरम्यान, एसएसटी पथकात गैरहजर नेकनूर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी आणि अपक्ष उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या शिक्षकावरही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या शिवाय, विना परवाना रॅली बाबत २ उमेदवारांवर तर चिन्हाच्या संभ्रमाबाबत १ अपक्षावर गुन्हा नोंद आहे. चिन्हात बदल करुन प्रचार केल्यानेही गुन्हा नोंद आहे.