शालेय विद्यार्थ्यांनी दिला

मतदार जागृतीचा संदेश

शालेय विद्यार्थ्यांनी दिला
मतदार जागृतीचा संदेश
मतदार संघनिहाय तयार केली मानवी साखळी
बीड, दिनांक 18 (जिमाका) : लोकशाहीचा धागा हो… मतदार राजा जागा हो…, नागरिकांचे नियत कर्म, मतदान आहे आपला धर्म… अशा घोषणा देत शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी मतदार जागृती केली.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने सामाजिक न्याय भवन ते क्रीडा संकुल पर्यंत मतदार जनजागृती रॅली व मानवी साखळी या उपक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांचा उत्सफूर्त प्रतिसाद होता.
जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या या रॅलीस हिरवी झेंडी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी दाखवली. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) महेंद्रकुमार कांबळे, स्वीपचे नोडल अधिकारी ओंकार देशमुख, समन्वयक बाबासाहेब उजगरे, गट शिक्षण अधिकारी समिंदर खान, राहुल चाटे यांची उपस्थिती होती.

error: Content is protected !!