बीड, दि. 9 : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शहरातील सर्व व्यापार्यांची अॅन्टीजन तपासणी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी घेतल्यानंतर काल शनिवारी सकाळपासून तपासणीला सुरूवात करण्यात आली आहे. आज दिवसभरात 3170 व्यवसायिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 137 जण पॉझीटीव्ह आढळून आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी दिली आहे.शहरातल्या 6 केंद्रावर ही तपासणी होत आहे.
काल शनिवारी घेण्यात आलेल्या टेस्ट मध्ये एकुण 106 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते.वाढता कोरोना प्रसार पाहता बीड मधील 5 शहरामध्ये लॉकडाउन 12ऑगस्ट पासून 10 दिवस बंद ठेवण्यात येईल.बीड, परळी, अंबाजोगाई, आष्टी, केज 12 ते 21 ऑगस्ट पर्यंत Lockdown करण्यात आले आहेत.