बाजारातून विकत घेतलेला भाजीपाला एक दोन दिवसात सडून जातो खराब होतो नंतर त्याची किंमतही राहत नाही….
पण शेतात मातीत आपली मुळ जमिनीत खोलवर रुतून आपल्या मातीशी एकनिष्ठ असलेलं पीक भाजीपाला कधी सुकत नाही ,सडत नाही आणि त्याची किंमतही कमी होत नाही…
म्हणून विकले जाऊ नका, जर विकले गेलात तर सडले जाल,आणि जर एकदा सडले गेलात तर समाजातून नाकरले जाल….
आपली किंमत जर कोणी कवडीमोल करत असेल तर त्याला त्याची किंमत दाखऊन द्या,
कारण मतदार राजा आहे ,आणि हे लोकप्रतिनिधी आपले सेवक आहेत…
आजही स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर ही प्रत्येक मतदार संघात छोट्या छोट्या मूलभूत सुविधांचा अभाव पाहायला मिळतो ..
हे अपयश फक्त त्या एका लोकप्रतिनिधीच नाही तर आपली निवड चुकली याचं आहे ..
म्हणून आपण ही आपल्या मागासलेल्या पणाला तितकेच जबाबदार आहोत.
लोकप्रिनिधी निवडून येतात त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा सर्वांगीण विकास होतो ,त्यात मात्र ते कुठं ही तिळमात्र कमी पडत नाहीत. पुढील पाच पिढ्या बसून खातील एवढं कमवून ठेवून जातात ,पण त्यांनी केलेलं एक साधं काम ही पुढील पाच वर्ष टिकत नाही..
हे असं का याचा जाब तुम्ही आम्ही मतदारांनी विचारायला हवा,
एक वेळेस तरी यांचा एक मोठा संभ्रम तोडा की पैश्याचा जीवावर आपण निवडणूक जिंकून येऊ…
हे काय करणार गाव ची गाव विकत घेऊ आणि आपल्या पुढील पिढ्यांना समृद्ध करण्यास मोकळे होऊ….
पण विचार करा आज ही मतदार संघातील छोट्या मोठ्या वाड्या,वस्त्या, तांड्या पर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही ,त्यांना लाईट नाही,पाणी नाही ही किती मोठी शोकांतिका आहे ,,
या गोष्टीचा कुठतरी विचार व्हायला पाहिजे..
कोरड्या विहिरीत कितीही मोटरी टाकून पाणी काढान्याचा प्रयत्न केला तरी पाणी बाहेर येऊ शकतं नाही, तस कोरडी आश्वासने देणाऱ्याला किती ही मतदान देऊन निवडून आणलं तरी त्यातून विकासच पाणी बाहेर येऊ शकतं नाही …
काळ्या पाषाणागत कठोर झालेल्या या नेत्यांना त्यांची किंमत नक्कीच दाखऊन द्या ..
त्यामुळं मतदान करताना विचार करून मतदान करा कारण आता एकदा चुकलात तर केलेल्या चुकिवर पुढील पाच वर्ष पश्चाताप करण्याखेरीज आपल्यापाशी काही एक उरणार नाही आणि त्याचा काही उपयोग ही होणार नाही …
त्यामुळं तुम्ही ठरवा विकून सडलं जायचं की
बिना विकता भिडून त्यांना नडलं जायचं
कारण आज नडलोत तर उद्या घडलोत समजा,
आणि आज झुकलोत तर उद्या संपलोत समजा. एक मतदार.....
(✍️आकाश नागरे..)