वंचितच्या सौ.प्रियंका खेडकर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होणार

वंचितच्या सौ.प्रियंका खेडकर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होणार

ओबीसी आरक्षणाचे नेते लक्ष्मण हाके यांनी दिला प्रियंका खेडकर यांना पाठिंबा.

बीड दि.15 (प्रतिनिधी)
ओबीसी आरक्षणाचे नेते लक्ष्मण हाके यांनी गौरव विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या सौ प्रियंका शिवप्रसाद खेडकर यांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे त्यांनी प्रचारात मोठे आघाडी घेतली आहे.
ओबीसी, मायक्रो ओबीसी, आदिवासी, मुस्लिम,तसेच एस.सी.ला मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रतिनिधित्व करण्याची संधी वंचित बहुजन आघाडीने दिली आहे. राज्यात किमान ओबीसींचे 100 आमदार निवडून आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून ओबीसींना मोठ्या प्रमाणात उमेदवारी दिल्या आहेत. गेवराई मतदार संघामधून सौ. प्रियंका शिवप्रसाद खेडकर यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केली. त्याच दिवसापासून गावगाड्यातील सर्वसामान्य जनतेच्या मनात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. पंडित, पवारांच्या दडपशाहीच्या राजकारणास कंटाळलेल्या मतदारांना वंचितच्या रूपाने नवा सक्षम पर्याय मिळाल्याचे बोलले जात आहे. तसेच ओबीसी आरक्षणाचे नेते लक्ष्मण हाकेंनी प्रियंकाताई खेडकर यांना आमदार करण्यासाठी आपला पाठिंबा जाहीर करून त्यांच्या प्रचारार्थ हाबुक ठोकल्याने हजारो गेवराईकरांनी आनंदोत्सव साजरा केला. ओबीसी आरक्षणाचे नेते लक्ष्मण हाके यांच्या पाठिंब्याने गेवराई विधानसभेतून सौ.प्रियंका शिवप्रसाद खेडकर यांच्या विजयावर शिक्कामोर्तबच झाल्याचे हजारो गेवराईकरांनी अधोरेखित केले.

error: Content is protected !!