वंचितच्या प्रचारार्थ लावलेली बॅनर अज्ञातांनी फाडले.
बीड दि.10 (प्रतिनिधी):
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रियंका शिवप्रसाद खेडकर यांना पिंपळनेर सर्कल मधून वाढता पाठिंबा मिळत असुन वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रियंका ताईंचा प्रचार घरोघरी जाऊन करत आहेत. मतदार संघात गावोगावी ग्रामस्थांमधूनही दांडगा प्रतिसाद मिळत आहे. पिंपळनेर सर्कल मधील सामान्य जनतेमधून आता फक्त वंचितच्या ‘प्रियंकाताई’च आमदार असा एकच सूर ऐकावयास मिळत आहे. गेवराईमध्ये पंडित, पवारांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. पिंपळनेर मध्ये प्रचारार्थ लावलेले अधिकृत बॅनर काही गावगुंडांनी फाडले असून दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या विकृत मनोवृत्तीचा प्रत्यय त्यांनी आणून दिल्याचे जाणवते. वंचित बहुजन आघाडी या कृत्याचा जाहीर निषेध करत असून,सर्व सुजाण नागरिकांना नम्र निवेदन करते की,पवार पंडितांची गुंडगिरी हाणून पाडण्यासाठी येत्या २० तारखेला वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रियंका शिवप्रसाद खेडकर यांच्या गॅस सिलेंडर या चिन्हा समोरील बटणावर मतदान करून प्रचंड मतांनी निवडून द्यावे. असे आवाहन जिल्हा संघटक डॉ.गणेश खेमाडे यांनी केले आहे.