आचारसंहितेच्या काळात 18 लाख 50 हजार महिला कडून जप्त


बीड दि.8 (प्रतिनिधी):
जिल्हयात विधानसभा निवडणुक 2024 अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागु असून पोलीस व महसुल विभागाचे चेक पोस्ट व चेकींग पथके तयार करण्यात आलेली आहेत. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक,बीड यांनी आचारसंहितामध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरुध्द कारवाई करण्यासाठी पोलीसांना आदेश दिले. त्यानुसार अंबाजोगाईत 18 लाख 50 हजार रुपये पकडले आहेत.
       दिनांक 07 नोव्हेंबर 2024 रोजी आणि गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक हनुमान खेडकर व त्यांचे सहकारी पोलीस अंबजोगाई शहरात गस्त घालत होते. गुरुवार पेठ ते मंगळवार पेठ दरम्यान एक महिला वेगाने बँगसह चालत असतांना दिसुन आली. तेव्हा सोबतच्या महिला अंमलदार सुशिला हजारे यांनी संशयीत महिलेस थांबविले. बँगेमध्ये काय आहे? असे विचारणा केली. सदर महिलेने पैसे असल्याचे सांगितले. पैसे कोणाचे व कशाचे आहेत? याचे समाधानकारक उत्तरे दिले नाही. सदर महिनेने नियमापेक्षा जास्त रक्कम बाळगल्याने पंचनामा करुन एकुण 18,50,000/- रु नगदी जप्त केले.
अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात पोउपनि हनुमान खेडकर यांनी सरकार तर्फे दिलेल्या तक्रारीवरुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 124 प्रमाणे कारवाई करण्यात आली.
सदरच कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ , अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. उस्मान शेख, ग्रेपोउपनि हनुमंत खेडकर व व त्यांच्या सहकारी पोलिसांनी केली.

error: Content is protected !!