दिवाळीच्या सणासुदीत बीड शहरातील नागरिकांना महावितरणकडून लाईट घालवून गिफ्ट देण्यात आले आहे . शहराच्या अनेक भागात अचानक वीजपुरवठा खंडित झाला. या अकस्मात वीज गुल झाल्याने नागरिकांना दिवाळी अंधारात साजरी करण्याची वेळ आलेली आहे .
अंधारात बुडालेल्या शहरातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सायंकाळी लक्ष्मीपूजनाच्या तोंडावर वीज गेल्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला. शहरातील अबाल वृद्धांचा यामुळे हिरमोड झाला. महावितरणच्या या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. नागरिकांनी महावितरण कंपनीचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
याप्रकरणी ऐन लक्ष्मीपूजनाच्या वेळी शहरात आमदार झाल्यामुळे याप्रकरणी चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे