मुंबई – बीडमधून कोणाला उमेदवारी मिळणार यावरचा सस्पेन्स अखेर संपला आहे. शरद पवार यांच्या गटातील राष्ट्रवादी काँग्रेसने संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली होती, पण बीडमध्ये उल्हास नरळ यांना तिकिट देण्यावरून संदीप क्षीरसागर यांच्या समर्थकांत नाराजी होती. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हेही राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी चर्चा होती.दरम्यान, जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत संदीप क्षीरसागर यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे आता उमेदवारीचा गोंधळ मिटल्याचे दिसत असले, तरी अजूनही आघाडीबाबतचा अंतिम निर्णय झालेला नाही.