बीड दि.26 (प्रतिनिधी):
-विधानसभा निवडणूक अनुषंगाने शुक्रवारी दि. 25 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 13.15 वाजता पोलीस ठाणे बीड शहर हद्दीमध्ये सुभाष रोडला नाकाबंदी करत असताना पोलीस नाकाबंदी पथकाला पाच लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. सदर जप्त रोकड प्रकरणी शहर पोलीस कारवाईकरत आहे.
शुक्रवारी अनंत कैलास दहिवाळ यांच्या ताब्यातुन ही रोकड मिळाली आहे. या संदर्भामध्ये तात्काळ ही माहिती आचारसंहिता अनुषंगाने कार्यरत असलेल्या FST पथकास ही माहिती पुरविण्यात आली आहे. सदर प्रकरणी पुढील कार्यवाई सुरू आहे.
सदर कारवाई अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वांबर गोल्डे, बीड आणि पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि बाबा राठोड, पोउपनि रियाज शेख पोना जयसिंग वायकर पोअं मनोज परजने पोअं अशपाक सय्यद करण्यात आली आहे.